रोटरी मित्र- मैत्रिणीनो,
गणेशोत्सव जवळ आला आहे आणि हीच वेळ आहे पुणे फेस्टिव्हल समवेत रोटरीचे इंद्रधनू मध्ये भाग घेण्याची.
गतवर्षीपासून सुरू झालेला हा कार्यक्रम याही वर्षी पुणे फेस्टिव्हल सोबत साजरा होणार आहे, तर चला सोबतचा EventGlint Form भरा आणि आपले व्हिडिओ लवकरात लवकर पाठवा.
यावर्षी कार्यक्रम छोटा असेल व उत्तम दर्जा हाच निकष असेल.
निवड झालेल्या प्रत्येक कलाकाराने रु 300 वर्गणी भरावयाची आहे,
( ग्रुप डान्सचा संख्येनुसार वेगळा विचार केला जाईल.)
संपूर्ण कार्यक्रम ट्रॅक वर सादर होणार आहे.
30 ऑगस्ट रोजी, रेझोनन्स स्टुडिओ, सिंहगड रोड 5.30 ते 8.30 या वेळात रंगीत तालीम होईल.
एक रंगीत तालीम घेतली जाईल. व तारीख लवकरच जाहीर होईल.
1) सुगम संगीत ( भावगीत, लोकगीत , हिंदी/ मराठी चित्रपटगीत)
2) नृत्य ( लोकनृत्य,बॉलिवुड नृत्य,शास्त्रीय नृत्य)
3) नाट्यछटा हे प्रकार सादर करता येतील.
नियम:
1. कार्यक्रमात रोटेरियन्स/ Anns / Annettes भाग घेऊ शकतील.
2. एका व्यक्तीस एकाच प्रकारात भाग घेता येईल.
3. प्रत्येक एंट्रीला 4 मिनिटे वेळ मिळेल
4. आपल्या प्रकाराचा स्पष्ट व्हिडिओ 20 ऑगस्टपर्यंत पाठवायचा आहे
5. सादरीकरण व्हिडिओ प्रमाणेच करायचे असेल
6. दिलेल्या तारखेपर्यंतच (20 ऑगस्ट) व्हिडिओ पाठवावेत
7. निवड समितीचा निर्णय अंतिम असेल.