गणेशोत्सव ही पुण्याची शान आहे, हा आपला समृद्ध वारसा आहे. गणेशोत्सव घेऊन येतो अमर्याद उत्साह, निर्मळ आनंद आणि त्याचबरोबर संस्कृती आणि परंपरांचा सुंदर मेळही या उत्सवात आता अनुभवू शकतो.
अशीच एक परंपरा आहे ढोल- ताशा वादनाची !! गणेशोत्सवात सगळं शहर जणू डोलत असतं ढोल-ताशांच्या तालावर..शरीरात हा ताल भिनतो आणि तो मनं जवळ आणतो. हा निर्मळ आनंद सर्वाना अंतर्बाह्य निर्मळ करून जातो
आपण सर्व रोटेरियन हे जाणतो की रोटरीमधे सेवाभावाइतकंच महत्त्व माणसा माणसातल्या परस्पर मैत्रीसाठी आहे.
मैत्रीपूर्ण वातावरणात केलेलं कार्य समाधान देतं, टिकून राहतं, म्हणूनच सर्व रोटेरियन कुटुंब आणि ॲनेट्स साठी पुण्यामध्ये प्रथमच आम्ही घेऊन आलो आहोत..
रोटरी मैत्री ढोल-ताशा पथक
गणेशोत्सवाची सुरुवात पुण्यात झाली तरी पुण्यातील रोटरी आजवर जरा बाहेरूनच या उत्सवात सहभागी होत असे पण आता वेळ आली आहे त्यात खराखुरा सहभाग घेण्याची. ढोल- ताशा पथकाच्या माध्यमातून हे शक्य होणार आहे. तसेच रोटेरियन्स मधील संबंध मजबूत होण्यासही यामुळे मदत होणार आहे.
गणपती मिरवणुकीत लाखो लोकांच्या नजरेस आपण येणार आहोत. त्यामुळे रोटरी इमेजला खूप फायदा होईल.
(मोठ्या मंडळासमोर वादन सादर करता येईल असंच हे पथक तयार करण्यात येणार आहे.)
खेरीज आपल्या तरुण पिढीवर उत्तम संस्कार ही या पथकामुळे होतील.
यावर्षीपासून या पथकाला शुभारंभ होत आहे.सोबत गूगल फार्म जोडलेला आहे, तो भरून आपण या पथकात प्रवेश घेऊ शकता.
31 जुलै ही नावनोंदणी अंतिम तारीख आहे, व 1 ऑगस्ट पासून रोज प्रॅक्टिस सुरू होईल.
स्थळ: रोटरी कम्युनिटी सेंटर पिंपरी,
वेळ: सायंकाळी 7 ते 9
पथकात रोटरी कुटुंबातील मुलीही भाग घेऊ शकतील 40 % मुली पथकात असतील असा आमचा प्रयत्न असणार आहे.
इवेंटग्लिंट फार्मवर सर्व माहिती घेऊनच प्रवेश दिला जाणार आहे.
प्रॅक्टिस च्या वेळेस चहा नाश्त्याची (सशुल्क) व्यवस्था केली जाईल,
First aid ची उत्तम सुविधा असेल.
ढोल- ताशाचे प्रशिक्षकही उपलब्ध असतील.
तर चला रोटरी मित्रांनो, रोटरीच्या पहिल्यावहिल्या मैत्री ढोल- ताशा पथकात आवर्जून सहभाग घेऊ .